Pune : पुण्यात ट्रक चालकाने तरुणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू
पुण्यात सध्या अपघातांचे सत्र सुरु आहे. पुणे पोर्श कार अपघातानंतर आता खराडी बायपास परिसरात भीषण अपघात झाला. या परिसरात एका भरधाव येणाऱ्या ट्रक ने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांना जोरदार पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला.
सदर घटना सोमवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास खराडीतील जकात नाका चौकात घडली.या प्रकरणात ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मयत दोघे जण लातूरचे असून सध्या वाघोली येथे शिक्षण घेत होते. सोमवारी तिघे जण दुचाकीवरून खराडी बायपास परिसरातील जकात नाका सिग्नलवर थांबलेले असताना वेगाने ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने जात असताना सिग्नलवर उभ्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. आणि दुचाकी काही मित्र पर्यंत फरफटत गेली. या अपघातात तिघेही जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य केले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर एकावर उपचार सुरु आहे. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात आरोपी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी साठी ससूनच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Edited by - Priya Dixit