बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By

नारळ रवा लाडू

साहित्य :- पाव किलो जाड रवा, सव्वा मोठी वाटी नारळाचा चव, पाव किलो साखर, अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी साजूक तूप, पाव वाटी दूध, पाच वेलदोड्यांची पूड, आवडत असल्यास बेदाणे दीड ते दोन टेबलस्पून, साखरेच्या निम्मे पाणी.

कृती :- तूपावर रवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. पाव वाटी दूध शिंपडून पुन्हा भाजावा. आता नारळाचा सव्वा वाटी चव घालून भाजण्यास सुरुवात करावी. रवा फुलू लागेल व कोरडाही होऊ लागेल त्यावेळी परातीत हे मिश्रण काढून घ्यावे. त्याच कढई किंवा पातेल्यात आता पाक करण्यास ठेवावा. मापाचे पाणी व साखर एकत्र करून मध्यम आचेवर ठेवावे. सतत ढवळत रहावे. दीडतारी पाक करावा, त्यात वेलदोडापूड, बेदाणे घालून नंतर रवा व नारळाचे मिश्रण घालावे. व्यवस्थित ढवळून झाकून ठेवावे. एक तासाने पुन्हा ढवळून बघावे.