सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (16:56 IST)

Rakhi festival 2020 : राखीच्या सणाला कुंकवाच्या तिळावर अक्षता का लावतात, जाणून घेऊ या....

कपाळ्यावर कुंकवाचा टिळा लावल्यावर अक्षता (तांदूळ) का लावतात : टिळ्यावर अक्षता लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
 
शास्त्रानुसार, तांदूळ किंवा अक्षताला हविष्य म्हणजे हवनामधील देवांना अर्पण करणारे शुद्ध अन्न मानले जाते. कच्च्या तांदुळांना टिळ्यावर वापर करणं हा सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. तांदुळामुळे आपल्या सभोवतीला नकारात्मक ऊर्जा सकारात्मक होते.
 
भाऊ बहिणीचा हा पावित्र्य सण मंगळदायी होवो आणि हा सण साजरा करताना काही चुका होऊ नये या साठी आपल्याला काही पारंपरिक गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
 
कपाळी कुंकवाच्या टिळ्यावर अक्षता लावण्याच्या संदर्भात असा विश्वास आहे की तांदूळ हा एक अतिशय शुद्ध आणि शुभ धान्य आहे. पूजेत काही कमतरता असल्यास त्या वस्तूंचा जागी प्रतिकात्मक म्हणून तांदूळ ठेवतात.
 
भावाला लावला जाणारा कुंकवाचा टिळा प्रत्येक दृष्टीने शुभ असावा, प्रत्येक भावना आणि सकारात्मक लहरी त्याच्यासाठी सौभाग्य घेऊन यावं म्हणून कपाळी कुंकवाच्या टिळ्यावर तांदूळ लावण्याची प्रथा आहे.