शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (16:05 IST)

‘निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान’ – संभाजी भिडे याचं वादग्रस्त वक्तव्य

मागील काही दिवसापुर्वी शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे  याचं एक वादग्रस्त विधान चर्चेत आलं होतं. यानंतर आणखी एक खळबळ उडवून देणारे वक्तव्य त्यांनी केल्याचं समोर आलं आहे. पारतंत्र्य, गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा हा देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे.
आज (शुक्रवारी) सांगली (Sangli) येथे दुर्गामाता दौडचा समारोप होता. त्यावेळी संभाजी भिडे यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपला, देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत? लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही, चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी, मारेकरी, गनीम, शत्रू आहे, पण हिंदूना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे. तो म्हणजे निर्लज्जपणात.
पुढे ते म्हणाले, जगाच्या पाठीवर 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, असं संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या देशात देशभक्तीचा, स्वतंत्रचा, भक्तीचा आपण कोण आहोत, या जाणिवेचा प्राण नाही. कशासाठी पोटासाठी इतकीच त्याची लायकी आहे. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही.या देशात कसली सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनवा, यासाठी मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती घेतली होती.असं ते म्हणाले. मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोना वाढतो. कोरोना येतो, हा थोतांड आहे.
कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे.चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे.दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वस्ती असती.तर सबंध देशाचं नेतृत्व करणारे ठरले असते, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.