रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (15:47 IST)

मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वाहन कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात 1 ठार, 5 गंभीर जखमी

accident
मुंबई आग्रा महामार्गांवर आठव्या मैल भागात आज पवणेतीनच्या सुमाराला झालेल्या अपघातात 5 जण गंभीर आणि 1 जण ठार झाला आहे. मुंबई नाशिक लेनवर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

भरधाव वेगात असणारे महिंद्रा थार वाहन क्र. MP 09 WH 9936 हे पुढील बाजूचा कंटेनर क्र. MH46 AR 7417 याला पाठीमागून ठोस मारून कंटेनरच्यामध्ये घुसल्याने अपघात झाला आहे. ह्या अपघातात महिंद्रा थार गाडीचा चालक विश्वजीत सोगरा जागीच ठार झाला आहे.
 
आकाश ढोलपुरे, अहमद वसारी, अमित, अक्षय कानडे, शक्ती ठाकुर हे 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्ग पोलीस केंद्र घोटी, पिंपळगाव पेट्रोलिंग वाडीवऱ्हे व नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी मदतकार्यासाठी उपस्थित होते.