सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (10:52 IST)

राज्यात 11 हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

राज्यात मान्यताप्राप्त वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांतील आर्टस्, कॉमर्स, सायन्स शाखांतील 11 हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या निर्देशाप्रमाणे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या गुणोत्तराचा नियम गृहीत धरला, तर याच रिक्त जागांचा आकडा दीड लाख इतका आहे.  
 
महाराष्ट्रात 4 हजार 500 महाविद्यालये आहेत. यूजीसीच्या निर्देशानुसार 20 विद्यार्थ्यांसाठी 1 प्राध्यापक असे प्रमाण आहे. सध्या हे प्रमाण लागू होण्याचा काही प्रश्‍नच नाही. कारण, राज्यातील बहुतांश महाविद्यालयांत प्राध्यापकांच्या 50 टक्के जागा रिक्त आहेत. मान्यताप्राप्त महाविद्यालये इतकाच विभाग घेतला, तर नियमाप्रमाणे 11 हजार जागा रिक्त आहेत. निवृत्त होणार्‍यांचे प्रमाण सतत वाढत असल्याने या रिक्त जागांमध्येही वाढ होत आहे. पर्याय म्हणून तासिका तत्त्व आणि कंत्राटी पद्धतीने अध्यापनाचे काम रेटले जात आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना वर्षभराने मानधन दिले जात असल्याने या मंडळींमध्येही अनुत्साह आहे.