सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (15:26 IST)

उरुसात चेंगराचेंगरीत14 भाविक जखमी

उस्मानाबाद येथील उरुसात चेंगराचेंगरी झाल्याची बातमी आहे. या घटनेत 14 भाविक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहे या उरुसात पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 
 
या उरुसात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. उरुसात वळू उधळला आणि त्यामुळे गोंधळ माजला. या कारणामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहितीत सांगतिले जात आहे. कार्यक्रमात हजारोंची गर्दी असताना ही घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी भाविकांना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.