स्कूल बसच्या अपघातात 30 विद्यार्थी जखमी
जामनेर तालुक्यात पाहुर शेंदुर्णी दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसचालकाचा बस वरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत भल्या मोठ्या झाडावर आदळून पालटून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली. या बस मध्ये अपघातात 40 पैकी 30 विद्यार्थी जखमी झाले आहे. बसचा पाटा तुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्यावरील बाजूच्या खोल भागात पडली. धडक झाल्यावर बस पालटून हा अपघात झाला. 30 विद्यार्थी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
Edited By - Priya Dixit