मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (18:15 IST)

वर्धात ऑटो आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 3 गंभीर

वर्ध्यात ऑटो आणि कंटेनरच्या भीषण अपघात होऊन 4 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर तिघे जखमी झाले आहे.वर्ध्याच्या पुलगाव नजीकच्या केळापूर येथे हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

हा ऑटो वर्ध्यावरून पुलगावच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरला जाऊन धडकला.ऑटोमधील चौघांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठविले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर मुंबई महामार्गावरून एक ऑटो 7 जणांना घेऊन पुलगावच्या दिशेने जात होता. सर्व प्रवाशी आठवडेच्या बाजारातून खरेदी करायला निघाले होते. केळापूर शिवारातून समोरून येणाऱ्या कंटेनरला रिक्षाची जोरदार धडक झाली.अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला. दोघांचा जागीच तर इतर दोघांचा उपचाराधीन असता मृत्यू झाला. तर ऑटोचालकासह तिघे गंभीर झाले. 

अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेनन्तर केळापूर गावात शोकला पसरली आहे. 
Edited by - Priya Dixit