1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2024 (09:43 IST)

भावली धरणात बुडून 5 जणांचा दुर्देवी मृत्यू

water death
नाशिकच्या इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये 3 मुली व 2 मुलांचा समावेश आहे. 

हे पाच जण  धरणावर फिरायला आले होते. सदर घटना 21 मे रोजी संध्याकाळी घडली आहे. 
नाशिकरोड भागातील गोरेवाडी परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तारू आणि तरुणी हे रिक्षाने इगतपुरीच्या भावली धरणावर फिरायला आले असता ते पाण्यात उतरले मात्र त्यांना पाण्याच्या अंदाज आला नाही आणि ते बुडाले. 

घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले 

हे सर्व जण गोसावी वाडी नाशिक रोड परिसरातील राहणारे असून अनस खान(15), हनीफ शेख(24), ईकरा खान(14), नासिया खान(15), मिजबाह खान (16) अशी मयतांची नावे आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे पाण्यात बुडू लागल्याने दोघे त्यांना वाचवण्यासाठी गेले असता तेही बुडाले. पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit