गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (16:28 IST)

पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये एका डॉक्टरने पत्नी हुंडा आणत नसल्याने तसंच तिच्यापासून घटस्फोट मिळावा यासाठी आई-वडीलांच्या मदतीने तिच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडले. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेल्या तक्रारीवरुन आरोपी पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
सदरच्या पीडित महिलेचे २०१५ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच तिच्या सासऱ्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. हुंडा मिळत नसल्याने शेवटी पीडित महिलेच्या पतीने तिच्याकडे घटस्फोटासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. महिलेने घटस्फोट द्यायला नकार दिला. दरम्यान, काही दिवसापूर्वी पीडित महिला आजारी पडली होती. याचाच फायदा तिच्या सासऱ्या लोकांनी घेतला. तिच्या पतीने ती आजारी असल्याने तिला सलाईन लावली. याच सलाईनच्या माध्यमातून त्याने तिच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडले असा आरोप पीडित महिलेने केला आहे.