दरीबडचीत वीज पडून शेतकऱ्यासह दोन म्हशींचा जागीच मृत्यू
सांगली +जत तालुक्यातील दरीबडची येथे वीज पडून शेतकऱ्यासह दोन म्हशींचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे दरीबडची परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.
दरीबडची सिद्धनाथ रस्त्यावरील जाधव वस्ती नाजिक राहणारे संगप्पा सन्नाप्पा पुजारी वय 70 हे आपली दोन जनावरे घेऊन रानात गेले होते. जनावरे हिंऊडून ते सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या वस्तीकडे परत येत असताना अचानक वादळी वारा आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. यात वीज पडून दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. वीज पहिल्यांदा त्यांच्या म्हशी नजिक पडली. पुजारी आपल्या जनावरांच्या पाठीमागेच होते. या विजेचा त्यांनाही जोरदार धक्का बसला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, दरीबडची परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून पावसाच्या बारीक सरी बरसत होत्या.वादळी वारा आणि विजांचा कडकडाट सुरूच होता. येथील शेतकरी पुजारी यांचा व दोन म्हशीचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच आजूबाजूच्या लोकांनी मोठी गर्दी केली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor