मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (16:07 IST)

भरधाव कार रसवंतीगृहात शिरली ,एकाचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात खंडोबाचीवाडी येथे एक भरधाव कार थेट रसवंतीगृहात शिरल्याने इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी हा अपघात झाला. समर्थ संतोष शिंदे (11) असे या मृत्युमुखी झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. अपघातांनंतर कार चालक पसार झाला आहे. 
वृत्तानुसार, तासगाव भिलवडी मार्गावर खंडोबाचीवाडी नायरा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या शेतात संतोष शिंदे यांचे रसवंतीगृह आहे. रविवारी या रसवंतीगृहात संतोष शिंदे यांचा मुलगा समर्थ बसला होता. भिलवडी रेल्वे स्थानकावरून भरधाव वेगाने येणारी कार रसवंतीगृहात थेट शिरली. आणि रसवंतीगृहाचे शेड देखील उचटकून शेतात पडले आणि वेगात येणाऱ्या कारणे तिथे बसलेल्या समर्थलाही फरफटत नेले. गाडीच्या पुढील चाकाखाली येऊन निष्पाप समर्थचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थ जमा झालेले पाहून कारचालक कार सोडून पळून गेला. ही संपूर्ण घटना पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे. कारचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून कारचालकाचा शोध सुरु आहे.   
 
Edited By- Priya Dixit