गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 जानेवारी 2024 (10:57 IST)

वीटभट्टीवर खड्ड्यात कोसळून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

child death
नाशिक शहरालगत असलेल्या पळसे कारखाना रोड येथील वीटभट्टी येथे तीन वर्षाची मुलगी खेळता खेळता पाणी साठवलेल्या खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडली.
 
पळसे नासाका कारखाना रोडवर असलेल्या एका वीटभट्टीवर उत्तर प्रदेशातील कुटुंब कामगार मजूर म्हणून कामाला आहेत. त्यांची तीन वर्षाची मुलगी रिंकी गंगाराम गौतम ही  सकाळी दहा वाजेच्या सुमारास काही मुलांसोबत वीटभट्टी जवळ खेळत होती.
 
वीटभट्टी जवळ माती कालवण्यासाठी पाण्याच्या साठवणुकीकरिता खोदलेल्या खड्ड्यात ती पडली यावेळी तिच्यासोबत खेळणाऱ्या इतर मुलांनी लागलीच आपल्या पालकांना सदर प्रकार सांगितला. मजूर कामगारांनी घटनास्थळी धाव घेऊन खड्यात साठवलेल्या पाण्यात पडलेल्या रिंकीला बाहेर काढून तत्काळ दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor