गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2024 (13:07 IST)

आईला शेवटचा मेसेज करून तरुणाची आत्महत्या

death
मराठा आरक्षणासाठी आईला शेवटचा मेसेज करत एका तरुणाने प्रवरा संगम येथे पुलावरून गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर येथे घडली आहे. ओम मोहन मोरे (20)
असे या तरुणाचे नाव हे. ओमचे वडील एका खासगी कंपनीत चालक पदावर काम करतात. ओम हा आई वडील लहान भावासह राहत होता.

ओम ने आईला शेवटचा मेसेज करत 'मिस यु आई' असे लिहून मी आयुष्य संपवत असल्याचे सांगितले. त्या नंतर त्यांने नदीत उडी मारली. आईने मेसेज वाचल्यावर ओंमचा शोध सुरु झाला. त्याचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन गोदावरीच्या पुला जवळचे मिळाले. नंतर त्याची दुचाकी देखील पुलावरच आढळून आली. मंगळवारी रात्री पासून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. नंतर बुधवारी सकाळी छत्रपती सम्भाजी नगरातील पथकाने शोध मोहीम सुरु केली. बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह पोलिसांना देण्यात आला. 

मराठा आरक्षण तसेच  आंतरराष्ट्रीय कबड्डी संघात निवडीसाठी त्याला दोन मार्क कमी पडल्यामुळे देखील तो तणावात असल्याचे त्याच्या चुलत भावाने पोलिसांना सांगितले. त्याने मोबाईल वरून आईला मिस यु आई, पप्पा, जय , मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे. या पुढे आईचा चांगला सांभाळ करा. चांगले जगा, असा मेसेज पाठवून आपले आयुष्य संपविले. 
 
 Edited by - Priya Dixit