गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (08:29 IST)

नगर-मनमाड मार्गावर अपघात, परराज्यातील साई भाविकांच्या क्रूझर जीपमधील एक महिला व २ पुरुष ठार

राहुरी तालुक्यातील गुहा पाट येथे नगर-मनमाड मार्गावर कंटेनर- क्रूझर जीप व दोन दुचाकी यांच्यात गुरुवार 16 डिसेंबर रोजी रात्री विचित्र अपघात झाला असून या अपघातात क्रूझर जीपमधील परराज्यातील ३ साई भक्त ठार झाल्याची माहिती असून अन्य गंभीर जखमींवर नगर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते .नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरु असल्याने गुहा परिसरात एकेरी वाहतूक सुरू असल्याने हा भीषण अपघात झाला असून या अपघातात परराज्यातील शिर्डी साई भाविकांच्या क्रूझर जीपमधील एक महिला व २ पुरुष ठार झली असल्याची माहिती समजते. अन्य गँभीर जखमीवर नगर, राहुरी येथे उपचार सुरू आहेतजखमींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे समजते.
त्यांच्यावर अहमदनगर नगर येथे उपचार सुरू आहेत. दुचाकीस्वार राहुरी येथील विनोद जगताप हा गँभीर जखमी आहे. त्याच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत. क्रूझर जीप मधील सर्व प्रवासी हे परराज्यातील साई भक्त आहेत.
त्यांची नावे व पत्ता मात्र समजू शकला नाही. कंटेनर चालक हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याकामी राहुरी,
देवळाली प्रवरा, लोणी येथील रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या होत्या. अपघात समयी शिर्डी संस्थांनचे विश्वस्त सुरेश वाबळे, अविनाश ओहळ, शरद वाबळे, चिंचोलिचे सरपंच गणेश हारदे, राजेंद्र बोरुडे,
देवळालीचे नगरसेवक आदिनाथ कराळे यासह गुहा, चिंचोली, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांनी मदत केली.घटनास्थळी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असताना राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने परिश्रम घेतले.