बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 जानेवारी 2022 (13:37 IST)

भांडणानंतर पती पत्नी ने उचलले टोकाचे पाऊल, प्राण गमावले

पती पत्नी यांच्यात भांडण होतच असतात. पण हे भांडण विकोपाला गेल्यावर त्याची किंमत मोजावी लागते. असेच काही घडले आहे. भंडारा शहरातील कारधा गावात. या गावातील राहणारे महेंद्र आणि मेघा सिंगाडे या दाम्पत्याचे .या दाम्पत्यांनी भांडण झाल्यावर विकोपालाला जाऊन टोकाचे पाऊल घेतले आणि स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतले. भंडारा शहरातील कारधा गावातील रहिवासी महेंद्र (38) आणि मेघा(30) या पती पत्नींमध्ये त्यांच्या 3 वर्षाच्या चिमुकल्यासमोर शुल्लक कारणांवरून भांडण झालं. ते भांडण विकोपाला गेलं आणि पती महेंद्र याने रॉकेलचा डबा घेऊन एकेकांवर टाकून पेटवून घेतले. या घटनेत सुदैवाने त्यांचा 3 वर्षाचा चिमुकला बचावला. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना शेजारच्या लोकांनी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनास पाठविले आहे.  पोलीस घटनेचा तपास करत आहे.