गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जानेवारी 2019 (10:54 IST)

अपमानास्पद वागणुकी विरोधात पत्रकारांचे पोलिसांन विरोधात आंदोलन

लातूर जिल्ह्यातील पत्रकारांना सातत्याने पोलिसांकडून अवमानास्पद वागणूक मिळते याचा निषेध आज पत्रकारांनी केला. गांधी चौकात धरणे धरली, निदर्शने केली. त्यानंतर सर्वांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची भेट घेतली. परवा तिरंगा आरोहणाच्या कार्यक्रमात मंत्र्यांची मुलाखत घ्यायला निघालेल्या आनंद दणके यांना पोलिसांनी अरेरावी केली. उचलून चक्क बाजुला केले. त्या आधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्याचा पाढा दीपरत्न निलंगेकर यांनी वाचला. आपण सारेच जनतेसाठी काम करतो, मग पोलिसांची मुजोरी कशासाठी? असा प्रश्न त्यांनी केली. जिल्हाधिकार्‍यांनी सगळे म्हणणे ऐकून घेतले आणि पोलिस अधीक्षकांशी बोलून घेतो असे आश्वासन दिले. पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे, व्हीआयपी पासेस मिळालेच पाहिजेत, यावेळी पिडीत आनंद दणके, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, मोहसीन खान, राजकुमार सोनी, रविकिरण सूर्यवंशी, रघुनाथ बनसोडे, दत्ता काळे, नितीन हंडे, नितीन बनसोडे, युवराज कांबळे, सतीश तांदळे, इस्माईल शेख, हारुण सय्यद, हारूण मोमीन, निशांत भद्रेश्वर, महेंद्र जोंधळे, अमर करकरे, सुरेश गवळी, बालाजी पिचारे, वामन पाठक, मासूम खान उपस्थित होते.