शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (16:21 IST)

केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार : अजित पवार

जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थांमध्ये केंद्र सरकारने अनेक बदल केले आहेत. केंद्राकडून जिल्हा बँकां चालवण्याचा अधिकार केंद्राने काढला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकराच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचाही इशारा अजित पवार यांनी दिला आहे. केंद्र सरकारने सहकार खात्याची निर्मिती केली असून आता सहकार क्षेत्रात केंद्राकडून हस्तक्षेप करण्याचा प्रकार सुरु झाला असल्याचे दिसतं आहे. जिल्हा बँका चालवण्याचा अधिका केंद्राने काढून घेतला असून अध्यक्ष आणि संचालक निवडीमध्येही केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याचेही अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं आहे.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी सहकारी बँकांच्या क्षेत्रात केंद्राचा हस्तक्षेप वाढल्याने बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या असल्याचे म्हटलं आहे. अजित पवार म्हणाले की, काही नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारने नवीन बदल केले आहेत त्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. यामध्ये जवळपास जिल्हा बँक चालवण्याचे अधिकार काढून घेतले आहेत.अध्यक्ष आणि संचालक बदलीमध्ये केंद्राचा हस्तक्षेप वास्तविक सगळ्यांनी मिळून बँक चालवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील पहिल्या पाचामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे. तरी देखील सहकार बँकामधले अधिकार स्वतःच्या ताब्यात घ्यावा असा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.