शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 डिसेंबर 2020 (15:47 IST)

अक्कलकोट स्वामी महाराज मंदिर २ जानेवारीपर्यत बंद

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. नाताळ, दत्त जयंती आणि नववर्षाच्या सलग सुट्ट्या आल्यानं या काळात स्वामी भक्तांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
 
२४ डिसेंबरच्या मध्यरात्री पासून २ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री पर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरता मंदीराकडे येण्याचे टाळावे, असं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे.