शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 जून 2022 (10:29 IST)

राज्यात पावसाचं आगमन ,मराठवाड्यात वीज कोसळून पाच ठार

Lightning
राज्यात पावसाचं आगमन झाले आहे. यंदा पाऊस चांगला होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मराठवाड्यात अति पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात पावसानं विजेच्या कडकडाटासह दमदार आगमन केलं आहे. मराठवाड्यात पाच जण पावसाला बळी गेले आहे. 
 
राज्यातील मराठवाड्यात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मध्ये औरंगाबादातील 2 जण तर जालन्यातील तीन जणांचा समावेश आहे. 
 
भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यात शिवनी मोगरा येथे गुरे चरायला घेऊन गेलेल्या गुराख्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पिसाराम चचाने असे मयत गुराख्याचं नाव आहे.  तर दोन लहान मुले जखमी झाले आहे.  
 
पिसाराम हे आपल्या दोन्ही मुलांसह गुरे चरायला गेले असता जोरदार पाऊस आला त्यांनी आपल्या मुलांसह एका झाडाखाली आश्रय घेतला आणि दरम्यान त्या झाडावर वीज पडून पिसाराम आणि त्यांची दोन्ही मुले गंभीररित्या भाजली.त्या तिघांना गावकरीनी ग्रामीण रुग्णालयात नेले तिथे पिसाराम यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर दोन्ही मुलांना पुढील उपचारासाठी भंडाराच्या रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी प्रकरणाची नोंद केली आहे.
 
एक अन्य घटनेत शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळं भोकरदन तालुक्यात कोदा येथे वीज कोसळून एक महिला ठार झाली आहे. गंगाबाई पांडुरंग जाधव, असे या मयत महिलेचे नाव आहे. तर दत्ता पांडुरंग जाधव, भारती जाधव हे जखमी झाले आहे. मयत गंगाबाई या शेतातील छपरावर पटी टाकताना अचानक वीज कोसळून त्या जागीच ठार झाल्या तर दत्ता पांडुरंग जाधव आणि भारती जाधव हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहे. गंगुबाई आणि दत्ता आणि भारती यांना रुग्णालयात नेले असता गंगुबाईंना डॉक्टरनी मृत घोषित केले आणि इतर दोघांवर उपचार सुरु केले आहे.