मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 जानेवारी 2023 (21:54 IST)

सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमेला गृहविभागाने निलंबित केले

विवाहितेचा विनयभंग करीत घरात घुसून पीडितेच्या कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, चार दिवसांनंतर राज्याच्या गृहविभागाने त्याला निलंबित केले आहे. बुधवारी याबाबतचे आदेश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
नारळी बाग येथील 30 वर्षीय पीडितेचा कारमध्ये विनयभंग केल्यावर आरोपी सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याने पीडितेच्या घरी जाऊन पती, दिरासह नातेवाईकांना धमक्या देत मारहाण केली होती. त्यांच्या बेडरुममधील वॉशरूम वापरण्यासाठी हट्ट करून धिंगाणा घातला होता.
 
१५ जानेवारीला पहाटे २ वाजता हा प्रकार घडला होता. दरम्यान, १६ जानेवारीला ढुमेला अटक केली. न्यायालयने त्यांना जामिन मंजूर केला. या प्रकरणाला तीन दिवस उलटले मात्र, ढुमे यांच्या निलंबनाचे आदेश आले नव्हते. 
Edited by : Ratnadeep Ranshoor