बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (14:57 IST)

भोंदूबाबाकडून आईसह तीन मुलींवर अत्याचार; ब्लॅकमेल करत उकळले आठ लाख रुपये

नाशिक जिल्ह्यातील  येवला तालुक्यातील एका भोंदूबाबाने व त्याच्या भावाने आईसह तीन मुलींवर बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. वेळोवेळी धमकी देऊन पीडितेकडून तब्बल आठ लाख रुपये उकळण्यात आले, तसेच अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याने अखेर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
 
याबाबत माहिती अशी, की मुलीचे लग्न जमत नाही म्हणून येवला तालुक्यातील नागडे येथील एक महिला एका भोंदूबाबाकडे गेली होती. तेव्हा या बाबाने मुलीला करणी करण्यात आली आहे, असे सांगून आईसह तीन मुलींना पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर चाकूचा दाखवून भोंदूबाबा सुफी अब्दुल आणि त्याचा भाऊ जब्बार शेख यांनी अत्याचार केले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. भोंदूबाबाचा भाऊ वकील असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी भोंदूबाबा आणि त्याच्या वकील भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने अत्याचाराचे व्हिडिओ शुटींग केले होते. हे शुटींग दाखवून ते पैशांसाठी ब्लॅकमेल करायचे. त्यांनी आतापर्यंत या कुटुंबाकडून सुमारे आठ लाख रुपये उकळले होते, आईसह तीन मुलींवर सुमारे सव्वादोन वर्षांपासून वेळोवेळी अत्याचार केल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले. या जाचाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. भोंदूबाबाने अत्याचाराबरोबरच लाखो रुपये वसूल केले आणि या पीडितांच्या मनात हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण केला. त्यांना मुस्लीम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केल्याचेही पीडितेने पोलिसांकडे नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या अत्याचाराच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा येवला शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.