रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 डिसेंबर 2018 (09:13 IST)

युती घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू : दानवे

‘शिवसेनेशी युतीसाठी चर्चा लवकरच सुरू होईल व आम्ही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युती घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू’,असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे. या निकालांचा केंद्रातील व राज्यातील राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
 
या निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर बोलताना दानवे म्हणाले,‘भाजपने २२ राज्यांमध्ये सत्ता काबीज केली आहे. तीन राज्यांमध्ये सत्ता मिळाली ना
 
ही, तरी त्याचा आगामी लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. रालोआतील घटक पक्षांना भाजपने नेहमीच योग्य सन्मान दिला आहे. घटकपक्षांशी योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी केंद्रीय नेतृत्व सक्षम आहे असे त्यांनी स्पष्ट केले.