शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (14:26 IST)

औरंगाबाद :बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू

राज्यात बैलपोळा सर्वत्र आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. बैलपोळा निमित्त बळीराजा आपापल्या बैलांना सजवतात .त्यांची पूजा करतात. बैल पोळा निमित्त आपल्या बैलांना धुण्यासाठी घेऊन गेलेल्या काका पुतण्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना औरंगाबादातील फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडली आहे. पंढरीनाथ कचरू काळे (33) आणि रितेश अजिनाथ काळे(18 )असे मृतकांची नावे आहेत. 
 
पोळा असल्याने पोळ्याच्‍या आदल्‍या दिवशी बैल धुण्यासाठी पंढरीनाथ काळे हे पुतण्या रितेश आणि पवन यांना सोबत घेऊन शेतालगत असलेल्या पाझर तलावात गेले असता बैल धुताना बैलाने अचानक पंढरीनाथ यांना झटका दिल्यामुळे ते तलावात जाऊन पडले. त्यांना बुडताना पाहून काकाला वाचविण्यासाठी पुतण्या रितेशने तलावात उडी घेतली आणि दोघांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.