बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (17:41 IST)

भगवानगडावरुन बाबांची रायफल आणि तलवारीची चोरी

अहमदनगरच्या अहमदनगर तालुक्यातील भगवानबाबा गडावर चोरी झाली आहे. भगवानगडावरुन बाबांची रायफल आणि तलवार चोरीला गेल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भगवानबाबांचे समर्थक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भगवानबाबा गड बांधण्यात आला आहे. भक्तांना बाबांच्या वापरातील वस्तूंचे दर्शन घेता यावे, यासाठी भगवानबाबा गडावर संग्रह ठेवण्यात आला आहे.
 
गडावरील शो-केसमध्ये ठेवण्यात आलेली भगवानबाबांची तलवार आणि बंदुकीचा सांगाडा चोरीला गेल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे भगवानबाबांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 
 
मराठवाड्याचे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या भगवान गडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबांच्या वास्तव्याने पावन झालेला भगवानगड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे.