गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (15:29 IST)

शहर बससेवेला नाशिककरांचा मोठा प्रतिसाद; ३ दिवसात १० हजारापेक्षा अधिक प्रवासी

शहरात सुरू झालेल्या बससेवेला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच केवळ ३ दिवसातच १० हजारापेक्षा अधिक प्रवाशांनी सिटीलिंक या बससेवा लाभ घेतला आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात ५० बसेसची सेवा देण्याचे निश्चित केले आहे. सद्यस्थितीत केवळ २७ बसेसच रस्त्यावर धावत आहेत. ५० बसेस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

तसेच, दुसऱ्या टप्प्यात २०० बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.म्हणजेच २५० बसेसची सेवा नाशिककरांना मिळणार आहे. सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शहरात रिक्षाची सेवा सुरू असली तरी त्याचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. त्या तुलनेत शहर बसचे तिकीट हे अल्प आहे. १० रुपयांपासून पुढे असलेले हे तिकीट प्रवाशांना परवडणारे आहे. त्यामुळेही सेवेला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.