बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (16:29 IST)

सर्व शाळांत CCTV बंधनकारक, 65 हजार शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणार

सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्यात सुमारे 65,000 शाळा आहेत ज्यात सरकारी, अनुदानित, खाजगी आणि विविध शिक्षण मंडळांशी संलग्न आहेत. आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी हे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठीची कार्यवाही शाळांना करावी लागेल.
 
राज्य आणि केंद्रीय आदी शिक्षण मंडळाच्या खासगी शाळांमध्ये सीसी टीव्ही बसवण्याचे स्पष्ट निर्देश गायकवाड यांनी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे दिले. तसेच प्रत्येक शाळेत यापुढे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद सकाळी आणि शाळा सुटण्यापूर्वी ठेवण्यात येईल. अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनद्वारे विचारणा करण्यात येईल.
 
राज्यात सध्या खासगी व्यवस्थापनाच्या आणि विविध मंडळाच्या सर्व शाळांमध्ये सीसी टीव्ही बसविण्याची कार्यवाही झाली की नाही याची माहितीही शिक्षण विभागाकडून घेतली जाईल. यासाठी सखी-सावित्री समित्यांचे गठण व नियंत्रण याबाबतची जबाबदारी आयुक्तांची राहील. तसेच मुलींच्या मार्गदर्शनाची जबाबदारी एका महिला शिक्षकांवर देण्यात येईल. शाळांमध्ये सदस्यांची नावे ठळकपणे दाखवावीत, असे सांगून गायकवाड म्हणाल्या की, शालेय शिक्षण आयुक्त या समित्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवतील.