गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (21:37 IST)

फडणवीस यांचे शरद पवार यांना आणखी एक आव्हान

devendra fadnavis
पहाटेचा शपथविधी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी सध्या  चर्चेत आहे. शरद पवार यांनी असं म्हटलं आहे की पहाटेच्या शपथविधीचा एकच फायदा झाला की राष्ट्रपती राजवट राज्यातून उठली. त्यांनी हे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना आणखी एक आव्हान दिलं आहे.
 
शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं आहे की पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली त्यांना मी एकच विचारू इच्छितो त्यांनीच हे स्पष्ट करावं की महाराष्ट्रात त्यावेळी राष्ट्रपती राजवट का लागली? कुणाच्या मागणीवरून राष्ट्रपती राजवट लागली? राष्ट्रपती राजवट लावण्या पाठीमागे कोण होतं? याचा खुलासा शरद पवारांनीच करावा म्हणजे तुम्हाला सुरूवातीपासून कडी जुळवता येईल. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवारांना नवं आव्हान दिलं आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor