शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (08:40 IST)

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्यामुळे तामिळनाडु, पॉडेचरी यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे रायलसीमा, तेलंगणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
 
२५ नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २६ नोव्हेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २७ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
 
२६ नोव्हेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. २७ नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.