शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (16:46 IST)

Chhatrapati Sambhajinagar :हृदयद्रावक! खेळताना दुधाच्या कढईत पडून चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

baby
Chhatrapati Sambhajinagar : घरात लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. अन्यथा अपघात घडू शकतात. अशीच एक घटना छत्रपती संभाजी नगर येथे  घडली आहे.खेळताना दुधाच्या कढईत पडल्याने अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.मोहम्मद जियान मोहम्मद इरफान असे या चिमुकल्याचे नाव आहे. सदर घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. छत्रपती संभाजी नगरच्या पैठणच्या संजरपुरा परिसरात घरात खेळत असताना दुधाच्या कढईत पडून हा चिमुकला जखमी झाला. त्याला तातडीनं घाटीच्या रुग्णालयात दाखल केले.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
 
पैठण शहरातील मालेगावात नेहरू चौक संजरपुरा येथील रहिवासी बब्बू शमी यांच्या मुली सोबत मोहम्मद जियान आला होता. सोमवारी सकाळी मोहम्मद जियान खेळत असताना दूध गरम करण्यासाठी ठेवलेल्या कढईत पडला. या मध्ये तो गंभीररित्या भाजला गेला. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर उपचार सुरु केले गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit