सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (21:00 IST)

कोरोनाबाबत खबरदारी घेतली जात नाही, कठोर निर्णय घ्यावे लागतील : अजित पवार

राज्यात कोरोनाबाबत खबरदारी घेतली जात नाही आहे. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतील असं अजित पवार यांनी सांगितलं. कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय. आठवड्यात दुपटीनं रुग्णवाढ होत आहे. कोरोनाबात खबरदारी घेतली जात नाही आहे. मास्क वापरलं जात नाही. याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल असा इशारा अजित पवार यांनी दिला. कोरोनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी शिवजयंतीवरुन राजकारण करु नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
 
शिवजयंती मर्यादित लोकांमध्ये साजरी करा. एका ठिकाणी १०० व्यक्ती असाव्यात असं देखील सरकारने सांगितलं, असं अजित पवार म्हणाले. शिवजयंतीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी शिवजयंतीवर बंधनं का आणता? असा प्रश्न उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना कोरोनाचं सावट आल्यावर आपल्या नागरिकांचा जीव वाचवणं, कोरोनाचा फैलाव होऊ नये हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपण याआधी महान व्यक्तींच्या जयंत्या, सण साधेपणाने साजरे केले. त्यामुळे कृपा करुन शिवजयंतीवरुन राजकारण करु नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.