गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 ऑगस्ट 2018 (09:47 IST)

गुन्हेगार अरुण गवळी पहिला

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर आणि मुंबई सर्वोदय मंडळ  यांच्या संयुक्त  विद्यमाने घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत कुख्यात गुन्हेगार अरुण गवळीने सर्वाधिक गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकावला. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी तसेच त्यांच्या आचारविचारात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी गांधी विचार परीक्षा घेतली जाते. अरुण गवळीने ही परीक्षा गंभीरतेने घेऊन त्यात घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत सहभागी कैद्यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्रांचे वितरण नागपूर मध्यवर्ती कारागृहातील प्रार्थना सभागृहात रविवारी करण्यात आले.