शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (21:41 IST)

लाईट-साउंड वाल्यानो आमच्याशी पंगा नको, एक दिवस तुमचा पण… ; कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांचा इशारा

maharashtra police
लेझर लाईट्स डोळ्यांना घातक आहे. मात्र मंडळाचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. लेझर लाईट्सचे दुष्परिणाम परिणाम होऊ नये, यासाठी त्यावर आवर घालणे आवश्यक आहे. साउंड सिस्टीम बाबत घालून दिलेल्या नियमाचे पालन झाले पाहिजे. कार्यकर्त्यांचा कितीही दबाव आला तरी कोणाच्या भावना दुखावतील असे गाणे आपल्या साऊंडवर वाजणार नाही. याची काळजी व्यावसायिकानी घ्याव्यात. अन्यथा कारवाई अटळ आहे. एक दिवस तुमचा असेल, पण 364 दिवस आमचे आहेत. लक्षात ठेवा, आमच्याशी पंगा घेऊ नका, असा इशारा जिल्हापोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिला.
 
आज कसबा बावडा येथील अलंकार हॉल येथे साऊंड चालक आणि लाईट व्यावसायिक यांची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर उपाधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरव यांच्यासह आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
 
परवानगी बाबत काय काळजी घ्याल? लाईट बाबत काय नियम असतील?
 
लाईट स्ट्रक्चर साठी 8×10 बाय परवानगी असेल, त्यापुढे परवानगी नाही
 
लेझर लाईट्सला परवानगी नाही.
 
ट्रॅक्टरवर लाईट्स साऊंड लावणार असाल तर त्यांची RTO विभागाची परवानगी आवश्यक, अन्यथा कारवाई
 
ट्रॅक्टर चालकची ट्रॅक्टर-ट्रॉली वाहन चालवणे परवानगी आवश्यक, वैद्य इन्शुरन्स, पियुसी आवश्यक
 
सार्वजनिक मंडळ रजिस्टर असेल तर परवानगी मिळणार
 
मंडळ आणि व्यावसायिक यांनी याची माहिती पोलीस स्टेशनला देणे आवश्यक
 
रात्री 12 वाजेपर्यंतचं परवानगी मिळणार
 
साउंड सिस्टीम बद्दल काय आहेत नियम?
 
संबंधित मंडळाने पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक