इयत्ता आठवीतल्या मुलीवर शाळेतून नेऊन बलात्कार केला
नातेवाईक असल्याचं सांगून आठवीत शिकणाऱ्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जालन्यात उघडकीस आहे. जालन्यातील एका इंग्रजी शाळेतील हा प्रकार आहे. आठवी मध्ये शिकणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलीचा मी नातेवाईक आहे तिच्या पोटात दुखत असल्याने मला तिला डॉक्टर कडे न्यायचे आहे असं सांगून आरोपीने मुलीला शाळेतून नेले आणि तिच्यावर बलात्कार केले. अजय गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुलगी उशिरा पर्यंत शाळेतून घरी आली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. नंतर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तातडीने शोध घेऊन मुलीची विचारपूस केली नंतर तिची वैद्यकीय तपासणी करून तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले. या अल्पवयीन मुलीवर लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. या प्रकरणी आरोपी अजय गायकवाड याला बाळ लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.