1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (21:46 IST)

एकनाथ शिंदे यांची दसरा मेळाव्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

eknath shinde
यंदा दसरा मेळावाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या पक्षात दिला असून यंदाचा दादर येथील शिवाजी पार्कवर मेळावा उद्धव ठाकरे हे घेणार आहे. बऱ्याच दिवसापासून दसरा मेळावा घेण्याची याचिका ठाकरे आणि शिंदे गटाने दिली असून मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळली असून उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. 

जरी उद्धव ठाकरे यांना मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे तरी ही त्यांच्या अडचणी कमी झाल्या नाही. शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. 

शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आल्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागतो हे पाहणे महत्वाचं आहे.