सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (08:18 IST)

महिला अधिकाऱ्या बरोबर थेट कार्यालया मध्ये जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने वनविभागात खळबळ

rape
सांगली  : सांगलीच्या वन अधिकाऱ्यावर एका महिला वन अधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सांगलीचे (Sangli) उप वन संरक्षक अधिकारी विजय माने यांच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यांमध्ये सदरचा गुन्हा दाखल झाला आहे.महिला अधिकाऱ्या बरोबर थेट कार्यालया मध्ये जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने वनविभागात (Forest Department) एकच खळबळ उडाली आहे.
 
सांगलीचे उप वनसंरक्षक अधिकारी विजय माने यांच्या विरोधात कुपवाड शहर पोलिस ठाण्यांमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.वन विभागातील एका महिला वनक्षेत्रपाल अधिकाऱ्याने याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.
 
कुपवाड या ठिकाणी असणाऱ्या वन विभागाच्या कार्यालय मध्ये सदर महिला वनक्षेत्रपाल अधिकारी कामाच्या निमित्ताने आली होती.यावेळी उपवनसंरक्षक अधिकारी विजय माने यांच्या केबिनमध्ये गेली असता,त्या ठिकाणी विजय माने यांनी सदर महिला अधिकाऱ्यास आपल्या डायरीमध्ये असणारे काही मजकूर वाचण्यासाठी जवळ बोलावत,सदर महिलेच्या सोबत जबरदस्ती करत विनयभंग केला आहे.
 
28 एप्रिल 2022 रोजी सदरचा प्रकार घडला आहे.या घटनेनंतर महिला अधिकाऱ्याला मानसिक धक्का बसला होता. नंतर सदर महिला अधिकाऱ्याने कुटुंबासमवेत कुपवाड पोलीस ठाण्यात जातात उपवनसंरक्षक अधिकारी विजय माने यांच्या विरोधात जबरदस्ती करण्याबरोबर विनयभंग केल्याची फिर्याद दाखल केली आहे.उप भवन संरक्षक अधिकारी विजय माने यांच्या विरोधात 354 कलम अंतर्गत विनयभंग गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी वन विभागाच्या कार्यालयातून वनसंरक्षक अधिकारी विजय माने यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतला आहे.