रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जानेवारी 2022 (11:45 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्या हस्ते ध्वजारोहण

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांच्या निवास स्थानी वर्षाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले . या प्रसंगी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यंटन, पर्यावरण आणि राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यसचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्रीचे प्रधान सचिव विकास खारगे हे उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा दिल्या.  
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया 12 नोव्हेंबर रोजी झाली होती. 2 डिसेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते मातोश्रीवरूनच राज्याचा कारभार हाताळत आहे. ते मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठका व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेत होते.