मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 31 मे 2022 (16:49 IST)

नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीत “महिला आरक्षण सोडत आज काढण्यात आली

voters
नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत आज काढण्यात आली. सकाळी 10 वाजता मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. ही सोडत पद्धती ऑनलाईन पाहण्याची सुविधा असल्याने राजकीय नेत्यांची उपस्थिती अत्यल्प दिसून आली.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा 133 जागांसाठी 67 जागा या महिलांसाठी राखीव आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी 19 जागा राखीव, तर अनुसूचित जमातीसाठी 10 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 19 पैकी 10 जागा महिलांसाठी राखीव, तर अनुसूचित जमातीसाठी 10 पैकी 5 जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित 52 सर्वसाधारण महिला राखीव आहे.
सुरुवातीला मनपा आयुक्त रमेश पवार यांनी आरक्षण सोडत कशी राबविली जाणार याची माहिती दिली. उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी आरक्षण सोडत कशी काढली जाणार याबाबत सविस्तर विवेचन केले.
सुरुवातीला अनुसूचित जाती महिला राखीव गटासाठी चिठ्ठी या सोडतीसाठी टाकण्यात आल्यानंतर महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते एक एक चिठ्ठी काढून अनुसूचित जाती महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 12 अ, 14 अ, 26 अ, 41 अ, 43 अ, 35 अ, 34 अ, 44 अ, 22 अ व 27 अ अशाप्रकारे अनुसूचित जाती महिला राखीवचे आरक्षण काढण्यात आले.
 
अनुसूचित जमाती महिला राखीवसाठी 10 जागांपैकी पाच जागांवर महिलांचे आरक्षण करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 7 ब, 11 ब, 34 ब, 4अ, 2 अ अशाप्रकारे महिला अनुसूचित जमातीच्या जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ही आरक्षण सोडत पहिल्या टप्प्यातील असून, उर्वरित टप्प्यातील आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू होती.
 
सर्वसाधारण महिला गटाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये 1 ब, 2 ब, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 8 अ, 8 ब, 9 अ, 10 अ, 12 ब, 13 अ, 14 ब, 15 ब, 16 अ, 17 अ, 18 अ, 19 अ, 20 ब, 21 अ, 22 ब, 23 ब, 24 ब, 25 ब, 26 ब, 28 ब, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 23 अ, 25 ब, 26 अ, 37 अ, 38 अ, 39 ब, 40 अ, 41 ब, 42 ब व 43 ब अशा एकूण 40 सर्वसाधारण महिलांचे आरक्षण काढण्यात आले.