रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (16:22 IST)

नाशिक ग्रामीण कोविड सेंटरमध्ये पोलीस व त्यांच्या कुटुंबियांना मोफत उपचार

नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ आडगाव येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रातील सत्तर बेडचे कोविड केअर सेंटर येथे पोलीस व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत कोविड उपचार दिले जात आहे.
 
आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोग्य सेवा सुसज्ज मिळाली म्हणून  प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करून त्याचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्याची संकल्पना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आखली. त्याला जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे केला.याच कोविड सेंटरमुळे पोलीस दलातील अधिकारी व पोलीस अमलदारांना परिवारातील सदस्यांना उपचाराची उच्च सुविधा मोफत मिळत असल्याने कोरोनाच्या धास्तीपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
 
या कोविड सेंटर मध्ये एकूण ७० ऑक्सिजन बेड आहेत. यात तेरा जण रुग्णांची देखभाल करण्यासाठी तैनात आहेत, त्यात तीन विशेषज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यामुळे सुसज्ज ग्रामीण पोलीस कोविड सेन्टरचा आदर्श पॅटर्न नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच बघायला  मिळाला आहे.