बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (13:00 IST)

महिला पोलिस कर्मचार्‍यांसाठी खुशखबरी, आता 12 ऐवजी 8 तासाची ड्युटी

मुंबई- महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे सरकारने महिला पोलिसांचा कामाचा वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार आता महिला पोलिसांना आठ तास ड्युटी करावी लागणार आहे. याबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे म्हणाले, 'सरकारने महिलांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याला 12 ऐवजी फक्त आठ तास ड्युटी करावी लागेल.
 
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील महिला पोलिसांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे. सरकारने महिला पोलिसांच्या कर्तव्याची वेळ कमी केली आहे. महिलांसाठी ड्युटीचे तास खूप लांब असल्याचे दिसून आले. अशा स्थितीत महिला पोलिसांच्या समस्या पाहता सरकारने त्यांची ड्युटी चार तासांनी कमी केली आहे.
 
अनेक वेळा सण-उत्सव बंदोबस्त गंभीर गुन्हे यानिमित्ताने त्यांना 12 तासापेक्षा अधिक वेळ करावंच लागतं. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे समोर आल्याने त्यांच्या ड्युटीमधून 4 तासांचा वेळ कमी करण्यात आला आहे. सरकारच्या नव्या आदेशानंतर महिला पोलिसांना आता 12 ऐवजी फक्त आठ तास ड्युटी करावी लागणार आहे. उल्लेखनीय आहे की महिला पोलिसांच्या कर्तव्याची वेळ बऱ्याच काळापासून चर्चेत होती. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केले आहे.