शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (10:01 IST)

गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घातली, शिवसेना कार्यकर्त्याचा आरोप

आमदार पडळकर यांनी गाडी अंगावर घातल्याचा आरोप शिवसेनेचे कार्यकर्ते राजू जानकर यांनी केला आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. या घटनेनं आटपाडीत प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

"तुला बघून घेतो, असं म्हणत मला पडळकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्याच्या चौकात बोलावले. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह आटपाडी पोलीस ठाण्यासमोर चौकात पोहोचलो. थोड्याच वेळात आमदार पडळकर हे कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यासमोर पोहोचले. आमदार पडळकर यांनी भरधाव गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला," असा आरोप जानकर यांनी केला आहे.
या घटनेत जानकर यांचा पाय मोडला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.