बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (09:00 IST)

दिव्यांग व्यक्तींना खुश खबर शिवशाही बसमध्ये ७० टक्के सवलत

एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमधून प्रवास करणार्‍या दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात 70 टक्के सवलत देणार आहे. तर त्यांचे प्रवास करणार्‍या साथीदारास प्रवास भाड्यात 45 टक्के सवलत मिळणार आहे. ही चांगली घोषणा परिवहन मंत्री दिवाक रावते यांनी केली. राज्यात महत्वाचे शहरे जोडणारी वातानुकूलीत शिवशाही बस लोकांच्या पसंतीस उतरली असून, राज्यभरात सर्व ठिकाणी प्रवाशांकडून या बसला अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे. सुरुवातीसबसमध्ये कोणत्याही सामाजिक घटकास सवलत दिली नाही. मात्र नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरीक, पत्रकार यांना शिवशाही बसमधून प्रवासासाठी भाडे सवलत दिली. तर अंध, अपंगांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन केलेल्या विनंतीचा सन्मान म्हणून दिव्यांग प्रवाशांना प्रवास भाडे सवलत दिली आहे असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री रावते यांनी दिले आहे. एसटी महामंडळाच्या बसमध्ये सध्या अंध आणि अपंगांना साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी 75 टक्के सवलत आहे. त्यांच्या साथीदारास 50 टक्के सवलत देण्यात येते. आता या प्रवास भाडे सवलत योजनेत वातानुकूलीत शिवशाही बसचाही समावेश करण्यात आला आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे 2 लाख 82 हजार इतके लाभार्थी असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यामुळे आता त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.