गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (11:02 IST)

सुनील पाटीलला राष्ट्रवादीनं सुरक्षित ठेवलं आहे का? आशिष शेलारांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मलिक यांच्यावर पलटवार करत शनिवारी (6 ऑक्टोबर) करण्यात आलेल्या आरोपांनंतर आता भाजपनं राष्ट्रवादी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
 
धुळ्याच्या सुनील पाटीलचा राष्ट्रवादीशी नेमका काय संबंध आहे? तो खरंच गायब आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला सुरक्षित ठेवलं आहे? असे प्रश्न भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
सुनील पाटील मंत्रालयातील बदल्यांचा धंदा चालवतो, असा आरोप शेलार यांनी केला आहे. सुनील पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून सीबीआयकडे याचा तपास द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे.
 
आमच्या हाती खूप काही लागलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळीच खरं काय ते सांगावं, अन्यथा सत्य समोर आल्यास कठीण होईल, अशा इशाराही शेलार यांनी दिला आहे.