मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (16:35 IST)

छेडछाडीमुळे रिक्षातून मारली उडी

औरंगाबाद- रिक्षाचालक छेडछाड करत असल्याने घाबरलेल्या तरुणीनं धावत्या रिक्षातून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे तरुणीच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे, तिच्या चेहऱ्यावरही जखमा झाल्या आहेत. 
 
सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान ही घटना भर रस्त्यात घडली जेव्हा तरुणी प्रायवेट क्लासेसला जात होती. रिक्षाचालक रिक्षे सोबत फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
 
जालना रोडवर मोंढा नाका येथून ही नेहमी प्रमाणे तरुणी रिक्षामध्ये बसली. परंतु रिक्षा चालकाचे चाळे बघून तरुणीला त्या रिक्षाचालकाविषयी संशय आला आणि तिने रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास विनंती केली. परंतु विनंती करूनही तो रिक्षा अजूनच वेगाने धावायला सुरु ठेवले तेव्हा घाबरून त्या तरुणीने धावत्या वेगवान रिक्षातून उडी मारली.
 
रिक्षातून बाहेर उडी घेतलेल्या तरुणीला गंभीर दुखापत झाली. ती रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेली असताना बघून अँब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुपचे निलेश सेवेकर यांनी मुलीला धीर दिला आणि विचारपूस करत तिच्या घरच्यांशी संपर्क साधला.
 
कुटुंबातील सदस्य आल्यावर तातडीने मुलीला जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. तिच्यावर उपचार करून नातेवाईकांनी तिला घरी नेले.