मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (19:26 IST)

लॉक डाऊन बाबत आरोग्यमंत्र्याचे मोठे विधान

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत आहेत या बाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉक डाऊन बाबत मोठे विधान केले आहेत. ते म्हणाले की कोरोनासाठी लॉक डाऊन हे काही पर्याय नाही. या साठी नागरिकांनी स्वतः कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाला रोखण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करायला हवे.त्या साठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क चा वापर करणे आणि सामाजिक अंतर राखून कोरोना प्रोटोकालच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे. कोरोनाचे नियम पळाले नाहीत तर कठोर निर्बंध करण्यात येतील असे ही आरोग्यमंत्री म्हणाले. 
या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांना बजावून सांगितले आहेत की कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही तर लॉक डाऊन लावण्याशिवाय पर्यायच उरणार नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की आज काही कोरोना बाधित रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे कारण त्यांचा मध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही.   
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवत आहे. दररोज कोरोना प्रतिबंधक लसीकरण देण्याचे प्रमाण देखील वाढवत आहे. नागरिकांना त्यांनी शिस्तीचे पालन करून जमावडा न करणे ,मास्क चा सतत वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे  या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. ,तसेच 60 वर्ष वरील ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावी.असे ही आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.