बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2020 (10:23 IST)

HSC-SSC Result 2020 : निकाल आज नाही, सुमारे 1 महिना वाट बघावी लागणार

महाराष्ट्राच्या 12 वींचा निकाल 10 जूनला लागणार अशी चर्चा होती मात्र निकाल आज लागणार नाही. उत्तरपत्रिका तपासण्याचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 
उच्च न्यायालयानं महाराष्ट्र बोर्डाचे इयत्ता 10 वी आणि 12 वीचे निकाल 10 जूनपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. परंतू 12 वीच्या उत्तरपत्रिकांचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं हे निकाल उशिराला जाहीर केले जातील असे संकेत महाराष्ट्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. जुलै महिन्यापर्यंत सर्व प्रकिया पूर्ण करून निकाल जाहीर केले जातील अशी माहिती मिळाली आहे. 
 
लॉकडाऊनमुळे दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपरही रद्द करण्यात आला होता. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तपत्रिकांचं काम अद्यापही सुरू असल्यानं निकाल रखडल्याचे संकेत मिळाले आहेत.