गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (11:20 IST)

मी दोघांमध्ये बसलोय, बाहेर कसा येऊ?- उद्धव ठाकरेंची युतीच्या शक्यतेवर प्रतिक्रिया

शिवसेना भाजपसोबत पुन्हा युती करणार असल्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळली आहे. "मी या दोघांमध्ये बसलो आहे. बाहेर कसा येऊ?" असं उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले
 
पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा आहे याबाबत प्रश्न विचारला.
 
यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "मी या दोघांमध्ये बसलो आहे. बाहेर कसा येऊ? 30 वर्षे एकत्र होतो तेव्हा काही झालं नाही आता काय होणार?"
 
यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचाही आरोप केला. केंद्र सरकारकडून अधिकारांचा गैरवापर होत असल्याचंही ते म्हणाले.