शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (14:54 IST)

मला बदनाम करणाऱ्यांवर मी कायदेशीर कारवाई करणार : अमोल काळे

महाराष्ट्र सरकारचे कुठलंही कंत्राट मी आजपर्यंत घेतलेले नाही. मी खासगी व्यवसाय़िक असून मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. तसेच मी भारतातच असून परदेशात गेलेलो नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप करत मला बदनाम करणाऱ्यांवर मी कायदेशीर कारवाई करणार असा खुलासा करत उद्योजक अमोल काळे यांनी शिवसेनेचे खासदार. नेते संजय राऊत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान,अमोल काळे यांनी संजय राऊत यांना निर्वाणीचा इशारा दिला असून आरोप प्रत्यारोपांची ही लढाई न्यायालयात जाणार हे नक्की आहे.
 
दोन दिवसांपूर्वी महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला होता. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अमोल काळे हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगत ते परदेशात पळून गेल्याचा दावाही राऊत यांनी केला होता.