1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

एटीएमची चार कोटीची रोकड घेऊन व्हॅन चालक पसार

पुण्यात सासणेनगरमध्ये  एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली चार कोटी रुपयांची रोकड घेऊन व्हॅन चालक पसार झाल्याची घटना आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या सासणेनगरमधील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी खासगी एजन्सीचे कर्मचारी व्हॅनमधून आले होते. त्यांच्यासोबत बंदूकधारी सुरक्षारक्षकही होता. पैसे भरण्यासाठी सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी गाडीतून खाली उतरले. हीच संधी साधत चालकाने गाडीतील चार कोटींच्या रोकडसह पोबारा केला.

सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करत व्हॅन थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्याने पळ काढला होता. याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.